+91 94222 36137, +91 94237 92490
रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटेग्रिटीचा पदग्रहण कार्यक्रम रविवार दि. 24/07/ 2022 रोजी पार पडला. या समारंभास रो. रवि डिक्रुझ यांना मावळते अध्यक्ष रो. सुयोग झंवर यांनी 2022 -2023 साठी अध्यक्षपदाचा पदभार सोपविला. याचवेळी रो. चंदना गांधी यांना सेक्रेटरी आणि रो. नचिकेत रसाळ यांना खजिनदारपदाचा पदभार सोपविण्यात आला. या कार्यक्रमास नगरमधील प्रथितयश हृदयविकार तज्ञ डॉ. एस. एस. दिपक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. हा कार्यक्रम अहमदनगर जिल्ह्याचे रोटरीचे उपप्रांतपाल रो. अड़. अमित बोरकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी उपप्रांतपाल रो. याड़. अमित बोरकर यांनी प्रांतपाल रो. रुपेश जखोटीया यांचा संदेश सर्व रोटरीयनसाठी वाचून दाखवला. या आपल्या शुभेच्छापर भाषणात रोटरी इंटेग्रिटीच्या सर्व नवीन सभासदांचे रोटरी परिवारामध्ये स्वागत केले.
मावळते अध्यक्ष रो. सुयोग झंवर यांनी मागीलवर्षातील सामाजिक उपक्रमांचा लेखाजोखा सादर केला. यावेळी रोटरी बुलेटीन व 'www.rotaryintegrity.com' या नवीन वेबसाईटचा प्रकाशन सोहळा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. मागील शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वीच्या सी. बी. एस. ई. आणि स्टेट बोर्ड विद्यार्थ्यांसाठी, सांदिपानी अकॅडमीच्या माध्यमातून शैक्षणिक शिबिर घेण्यात आले होते. त्यामध्ये 90% पेक्षा जास्त मार्क मिळवलेल्या पहिल्या 5 विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुखपाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सांदिपनी अकॅडमीचे रो. बालराजु सर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना डॉ. दिपक यांनी रोटरी इंटरनॅशनल क्लबने पोलिओ निर्मूलनसाठी केलेल्या कार्याचा विशेष नामोल्लेख केला. तसेच समस्त रोटरीयनचे सामाजिक कार्यात असलेल्या सहभागाबद्दल कौतुक केले. नगरमध्ये येत्या वर्षभरात रोटरी इंटीग्रिटीच्या माध्यमातून विविध आरोग्य शिबिरे आणि कार्यशाळा घेण्याचे आश्वासनही दिले. नवनिर्वाचित अध्यक्ष रो. रवि डिक्रुझ यांनी पुढील वर्षभरात रोटरी इंटीग्रिटीच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक, आरोग्यविषयक, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. रो. रफिक मुन्शी यांनी मागील 3 वर्षातील अध्यक्षांच्या वतीने केलेल्या कामांची माहिती उपस्थितांना दिली.
या कार्यक्रमात नवीन 22 सदस्यांनी रोटरी क्लबचे सदस्यत्व स्विकारले त्यामध्ये रो. वसिम हुंडेकरी, रो. प्रा. गौरी पाटील, रो. धिरज गोलांडे, रो. उद्योजक ओमप्रकाश झिकरे, रो. उद्योजक सचिन पाठक, रो. डॉ. राजिव चिटगोपेकर, रो. प्रा. अमित पुरोहित, रो. अमित धोकरीया, रो. प्रणित अनमल, रो. उद्योजिका अर्चना पलुसकर, रो. इंजि. मंगुली नायक, रो. डॉ. प्रमोद जगताप, रो. राधिका जोशी, रो. डॉ. सईद शेख, रो. प्रा. सामीसर, रो. सय्यद मुसा हे प्रामुख्याने आहेत. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रो. निखिल कुलकर्णी आणि रो. अर्चना पलुसकर यांनी केले. नवनिर्वाचीत सेक्रेटरी रो. चंदना गांधी यांनी सर्वांचे आभार मानले.